आवाहन

भाविकांना नम्र आवाहन

अंबाजोगाई श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करीत आहो की, अंबाजोगाई हे मराठवाड्यातील तालुक्याचे ठिकाण आदिमाता श्री जगदंबेच्या वास्त्यव्याने पुनीत झालेले, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आहे.


आदिमाता जगदंबा येथे योगेश्वरीच्या रूपाने अनादिकालापासून वास्त्यव्याला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविक भक्त श्री योगेश्वरीच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी फार मोठ्या संखेने येतात.श्री योगेश्वरी मंदिर हेमाडपंथी बांधकाम असलेले आहे.


परंतु वैशिष्ट्य हे की, इथले शिखर इतर शिखरांपेक्षा निराळे आहेत. शिखर पाच माजली असून शिखराची उंची सत्तर फुट आहे. पहिल्या मजल्यावर चारही बाजूंनी रामायण, महाभारतातील निवडक प्रसंग असून दुसर्या मजल्यावर श्री योगेश्वरी देवीचे व्दादश अवतार कोरलेले आहे.

तिसर्या मजल्यावर दशावतार चौथ्या मजल्यावर नवग्रह आणि पाचव्या मजल्यावर सप्तॠषी विराजमान झालेले आहेत. असे हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी चितारलेले आणि अप्रतिम कलाकुसर असलेले शिखर आहे.

विश्वस्त मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या सर्वच भागातून येणाऱ्या देशभक्तांच्या निवासासाठी १७ खोल्यांचे सुसज्ज व सर्व सोयींनीयुक्त असे यात्री निवास बांधले आहे. मंदिराच्या उत्तरेस तीर्थासमोर भव्य असे मंगल कार्यालय बांधलेले आहे. ज्यामध्ये लग्न, मौंजी आणि सभा, संमेलने होतात.